Rohit Pawar On Ajit Pawar : एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले असतानाच, दुसरीकडे पवार कुटुंबातील वादात आणखी एक ठिणगी पडली आहे. कारण अजित पवारांचे (Ajit Pawar) सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी देखील अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, यावरच आता रोहित पवारांची (Rohit Pawar) प्रतिक्रिया येत असून, श्रीनिवास काकांचा भूमिका योग्य आहे. अजित पवारांनी घेतलेली भूमिका त्यांना महागात पडेल असे रोहित पवार म्हणाले आहेत. तर, स्वतःच्या भुमिकेमुळे 'दादां'चे कुटुंब एकटे पडले असेही रोहित पवार म्हणाले. 


श्रीनिवास पवार यांच्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "श्रीनिवास काकांचा व्हीडिओ मी पाहिला आहे. लोकांना वाटते तीच भूमिका त्यांनी घेतली आहे. दादांना त्यांनी जवळून बघितलं आहे आणि साहेबांनाही बघितलंय. श्रीनिवास पवार यांची भूमिका पवार कुटुंबीय म्हणून सामान्य माणसांना पटणारी भूमिका आहे. पवार साहेब हे पवार कुटुंबीयांची ओळख आहे. श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांची संस्कृती बोलून दाखवली आहे. अजित पवार यांनी भूमिका घेतल्यावर कुटुंब म्हणून आम्हाला वाईट वाटलं होतं. कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. पण दादांसह त्यांच्या जवळच्या पवारांनी म्हणजेच काकींनी आणि त्यांच्या दोन मुलांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, पवार कुटुंबात 100 पेक्षा जास्त पवार आहेत, असे रोहित पवार म्हणाले. 


स्वतःच्या भुमिकेमुळे 'दादां'चे कुटुंब एकटे पडले


मला एकटे पाडले जात असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की,"अजित पवारांना एकटे पाडण्यात आले नसून, त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांचे कुटुंब एकटे पडले आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली ती साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका आहे. स्वाभिमानी नागरिकाला विचारल्यास तोही तेच बोलेल. दादांनी घेतलेली भूमिका महागात पडेल, असेही रोहित पवार म्हणाले. 


अनेक आमदार स्वगृही परतण्याच्या तयारी


अनेक आमदार परत येण्यास इच्छुक आहेत. लोकसभेतच भाजप सहकारी पक्षांना इतकं दाबत असेल, तर विधानसभेत आपल्याला भाव पण देणार नाही अशी या आमदारांची भूमिका आहे. त्यामुळे कशाला नुकसान करावं असं त्यांना वाटतं. भाजपनं माढाचे तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळे भाजपात देखील खदखद आहे. अनेकांना वाटतं वेगळी भूमिका घ्यावी, त्यामुळे सकारात्मक निर्णय काही होईल असं वाटतं. महायुतीमधील भाजपचे मित्र पक्षातील 12 ते 13 आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहेत. त्याचे प्रतिनिधीत्व मराठवाड्यातील नेते करत आहेत. मराठवाड्यातील एक मोठा नेता देखील यात आहे. भाजपसोबत आहे असं दाखवायचं आणि दुसरीकडे चर्चा करायची असं सुरु आहे.  राष्ट्रवादीच्या 22 -23 आमदारांना वाटतं भाजप आपल्याला न्याय देणार नाही. भाजप 200 जागांवर लढणार आहे. मग राहतात 88 जागा, अशात एकनाथ शिंदेंना किती आणि अजित पवारांना किती हा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत, असे रोहित पवार म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आधी पुतण्या, मग भाऊ अन् आता वहिनींचाही 'दादां'ना विरोध; अजित पवारांना दिवसभरातील दुसरा धक्का