Rohit Pawar on Anjali Damania: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar controversy) सरकारी अधिकाऱ्याला काय गोट्या खेळत होता काय? खिशातून हात काढ अशा भाषेमध्ये सुनावल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी (Anjali Damania statement) ट्विट करत जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा? अशी विचारणा ट्विट करत केली होती. यावरून अंजली दमानियांना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare criticism) ट्विट करत अंजली दमानिया यांच्या सिलेक्टिव्ह भूमिकेवरून (Maharashtra politics news) हल्लाबोल केला होता. त्यानंतर माननीय सुषमाताई ही ट्विट वाचून गंमत वाटली असं म्हणत अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आता या दोघींच्या वादामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा उडी घेत तीन सवाल केले आहेत.

Continues below advertisement


 


भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु 


रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माननीय अंजलीताई, सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला हा रिप्लाय बघून केवळ गंमतच वाटली नाही तर काही शंका देखील दूर झाल्या, आपल्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही, पण तरीही खालील प्रमुख तीन विषय पुराव्यासह आपल्या निदर्शनास आणून देतो. 


1)आज राज्यातल्या शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी 20 लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रु. देऊन जाहिरातबाजी करणं योग्य आहे का?


2)मेघा इंजिनिअरिंग कंपनीने अवैध उत्खनन केलं म्हणून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी 95 कोटींचा दंड ठोठावून त्याचं साहित्य जप्त केलं, परंतु महसूलमंत्र्यांनी मात्र केवळ 17 लाख रु. दंड भरण्यास सांगून जप्त केलेलं साहित्य परत करण्याचे आदेश दिले, हे योग्य आहे का?


3)#सिडको ची 5000 कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या घशात घातली. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे 12000 पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री याप्रकरणी भूमिका घेत नाहीत, हे योग्य आहे का?


या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांवाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावे. अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील! आपणास शुभेच्छा..!


सुषमा अंधारेंची खोचक टीका


रोहित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनीही अंजली दमानिया यांच्यावर सिलेक्टिव्ह भूमिकेवरून (Corruption issues Maharashtra) तोफ डागली होती. अंधारे यांनी ट्विट करत म्हटले होते की, अंजली दमानिया या व्यक्तिरेखेबद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं. चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजीनियरिंग कंपनी याच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली. ज्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यावरून मा. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले. मात्र, दमानियांनी बावन्नकुळेचा ब सुद्धा उच्चारला नाही. पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल  वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत. मात्र, आ. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या. म्हणजे भाजपचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार  दिसत नाहीत आणि  पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते. फारच अनाकलनीय गूढ आहे बाबा.. 


सुषमा अंधारेंच्या ट्विटवरून दमानियांचा पलटवार 


यानंतर दमानिया यांनी ट्विट करत पलटवार केला होता. माननीय सुषमाताई, हे ट्वीट वाचून गंमत वाटली. प्रत्येक विषय माहीत असायला मी काही राजकीय पक्षात नाही. पण जो गंभीर विषय माझ्या पर्यंत येतो तो मी कधीच सोडत नाही.  मी उगाच बोलत नाही. विषय घ्यायचा, चिघळायचा आणि दुसऱ्या दिवशी विसरून जायचा हे आमच्या स्वभावात नाही. मेघा इंजीनियरिंगचे वर उद्धव ठाकरे पण काहीच का बरं बोलत नाहीत? त्यांनी बोलायला हवं. तुम्ही कायदेशीर का बरं लढत नाही? जर तुम्ही PIL केलीत तर तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा. तुम्ही करत नसाल तर माझ्याकडे पेपर पाठवा. प्रत्येक भ्रष्टाचाराचे लढा ताकतीने कसा द्यायचा त्याचा प्रत्येय तुम्हाला येईल. सिलेक्टिव्ह लढे करायला आम्ही कुठच्याच गटात नाही.


इतर महत्वाच्या बातम्या