एक्स्प्लोर

Bhu-Aadhaar : माणसांप्रमाणे आता जमिनींनाही मिळणार भू आधार क्रमांक; 2 कोटींहून अधिक पोटहिश्शांचा 'डिजिटल' कायापालट, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय

Bhu Aadhaar Number: माणसांप्रमाणे आता जमिनींनाही मिळणार भू-आधार क्रमांक मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Bhu Aadhaar Number: माणसांप्रमाणे आता जमिनींनाही मिळणार भू-आधार क्रमांक मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी होणार आहे. परिणामी, यामुळे 7/12 आणि नकाशांचा मेळ बसणार असून 2 कोटींहून अधिक पोटहिश्शांचा 'डिजिटल' कायापालट होणार आहे.

Bhu-Aadhaar : शेतजमिनींच्या नकाशा तसेच 7/12 उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच 7/12 उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (7/12) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच. शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता 'भू-आधार' क्रमांक (ULPIN) मिळणार आहे. राज्यात 1890 ते 1930 या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर 1992 पासून डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल 2 कोटी 12 लाख 76 हजार 499 नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि 7/12 उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता 'पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प' सुरू करण्यात येत आहे.

काय आहे 'भू-आधार'? (What is Bhu-Aadhaar)

-केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजेच 'भू-आधार' क्रमांक दिला जाणार आहे.

- आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल.

- यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे.

Land-Aadhar : भू -आधारमुळे शेतकऱ्यांना होणार फायदे

- जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद कमी होतील.

- ७/१२ उताऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल.

- पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल.

- जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.

अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना

- या प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

- तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे..

आणखी वाचा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DCM Sunetra Pawar: अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
Maharashtra Live Blog Updates: धाराशिवमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाटेला?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिवमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाटेला?
Nashik Crime News: दोघांच्या प्रेमात अडथळा; मुस्काननं प्रियकरासोबत रचला भयानक प्लॅन, डंबेल्स बांधून नवऱ्याला नदीत फेकलं अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
दोघांच्या प्रेमात अडथळा; मुस्काननं प्रियकरासोबत रचला भयानक प्लॅन, डंबेल्स बांधून नवऱ्याला नदीत फेकलं अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Anil Parab: मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, महापौर बाईंनी भरतीवरील स्टे काढला; देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्यात का?, अनिल परब नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, महापौर बाईंनी भरतीवरील स्टे काढला; देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्यात का?, अनिल परब नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Embed widget