सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम राहून कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. तिकडे सोलापुरात एसटीच्या विभागीय कार्यलयाने आदेश काढलाय की, संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.


सोलापुरातील राज्य परिवहन विभागीय कार्यलयाने पत्रक काढून 11 आदेशच जारी केले आहेत.

सोलापूरच्या विभागीय कार्यलयाचे 11 आदेश :

1. चालक व वाहक यांचे विश्रांतीगृह रिकामे करुन घ्या.
2. जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संपामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करा.
3. लाईन चेकिंग स्टाफ, वाहक व पर्यवेक्षक यांना ईटीआयएम देऊन विनाथांबा फेऱ्या सोडा.
4. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना खासगी प्रवाशी वाहतूकदाराकडे पाठवण्यात यावे.
5. बसस्थानकावर अनधिकृत प्रकारचे व खासगी प्रवाशी चढ-उतार करणाऱ्या वाहतूकदारांचे आगार व्यवस्थापकांनी चित्रीकरण करुन अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा.
6. नियंत्रण विभाग चालू ठेवण्यात आले आहे.
7. सर्व आगार व्यवस्थापकांनी मुख्यालया सोडू नये.
8. सर्व पालक अदिकाऱ्यांनी प्रत्येक आगारात हजर राहणे.
9. आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांनी बसस्थानकावर उभे राहून दैनंदिन परिस्थितीची हाताळणी करावी.
10. इतर विभागाचे मुक्कामचे कर्मचारी गाडी घेऊन जात असतील, तर त्यांना वेळेवर प्रवाशी मार्गस्थ करणे.
11. कोणत्याही कर्मचाऱ्यास अॅडव्हान्स रक्कम देऊ नये.
हे आदेश पाहता, एसटी महामंडळाला संपावर तोडगा काढयचा आहे की संप चिघळवायचा आहे, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी


संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार?

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नाही, मग गुन्हे का?

अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?

'..तर एसटी कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कामगार भरु'