मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक दर मिळावा म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याची माहिती आज भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. “कच्च्या खाद्य तेलावर कुठलेही आयात शूल्क नव्हते. आता कच्च्या तेलावर २० टक्के आयात शूल्क आकारले जाणार आहे. तर शूद्ध तेलावर असलेला १२.५ टक्के कर वाढवून ३२.५ टक्के इतका करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात पिकणाऱ्या सोयाबिनचे दर वाढणार आहेत, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच सोयाबिन खरेदीचा निर्णयही केंद्र सरकारने घेतलेला आहे. यासोबतच कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे.
काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतीकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल.
1) खाद्यतेलाच्या आयातीवर आधी कोणतेच शुल्क नव्हते, त्यावर आता २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल. याशिवाय रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर कस्टम शुल्क १२.५०% वरून ३२.५०% करण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतलेला आहे.
2) कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे संपविली आहे. यातून कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल.
3) बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी सरकारने नेमकं काय काय केलं?
- पंतप्रधान मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
- सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठलीही आयात ड्युटी नव्हतं, २० टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाइंड तेलावर साडेबारा टक्क्यावरून साडे बत्तीस टक्के करण्यात आला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा फायदा होणार आहे.
- सोयाबीनच्या किमती बाजारात वाढण्याकरिता त्याचा मोठा फायदा होणार आहे, सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय केंद्राने घेतला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकरी त्या ठिकाणी निर्णयामुळे होणार आहे.
- कापसाच्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.
- कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकली आहे.
- एक्सपोर्ट ड्युटी ४०% वरून २०टक्क्यावर आणली आहे त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होण्याकरिता वर जाण्याकरिता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे.
- बासमती राईसच्या एक्सपोर्टवर जी ड्युटी होती त्या ठिकाणी काढण्यात आली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणारा शेतकरी यालाही खूप फायदा होणार आहे.
- या ठिकाणी या सगळ्या निर्णयाचा सगळा फायदा सोयाबीन,कांदा, बासमती शेतकऱ्यांना होणार आहे.
- हा निर्णय
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतीकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा,… https://t.co/zM05tIaQDO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2024
type="interlinkingkeywords">महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखावून जाईल.
एकनाथ खडसेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) खडसेंच्या दाव्याबाबत प्रश्नावर म्हणाले, 'ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. मात्र, त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, तो निर्णय आम्हा सर्वांना मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर योग्य निर्णय केला जाईल.