Ravikant Tupkar Protest: सरसकट शेतकऱ्यांच्याकर्जमाफीसाठीशेतकरीनेतेरविकांततुपकर (Ravikant Tupkar Activist Protest) यांनीअन्नत्यागआंदोलनाचापवित्र उचललाआहे. याआंदोलनाचाआजचाचौथादिवसअसून रविकांत तुपकरांची(Ravikant Tupkar) प्रकृतीखालावलीआहे, परिणामीयाआंदोलनालाआता हिंसक वळण लागलेआहे. मुंबईत मंत्रालयासमोरील झाडावर चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरुकेलंय. यावेळीएककार्यकर्ता झाडावर चढला. यावेळीहातात सुतळी बॉम्बचीबॅगघेऊनत्यानेआंदोलनसुरुकेलं. दरम्यान, अडविण्यासाठीआलेल्यापोलिसांवर सुतळी बॉम्ब देखील फेकला आणिपुढे राष्ट्रगीत देखील बोलू लागला. रविकांत तुपकरांच्या या कार्यकर्त्यांमुळेमात्रकाहीकाळएकचगोंधळउडालाहोता. (Ravikant Tupkar Activist Protest)
Ravikant Tupkar : ...अन्यथा राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करतील
मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. शांततामय आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कुलाबा पोलीस ठाण्यात विनाकारण अडवून ठेवले आहे. झटापटीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची साधी वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जखमी कार्यकर्त्यांना तात्काळ उपचार देऊन सर्वांना बिनशर्त मुक्त करा, अन्यथा राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि त्यानंतरच्या परिस्थितीला शासन व प्रशासनच जबाबदार (Ravikant Tupkar Activist Protest) असेल. असाइशाराशेतकरीनेतेरविकांततुपकर (Ravikant Tupkar)यांनीदिलाआहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असेहीरविकांततुपकर (Ravikant Tupkar) म्हणालेत.
Ravikant Tupkar Protest: बुलढाण्यात कर्जमुक्तीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं म्हणत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चार दिवसापासून सुरू केलेल अन्न त्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलंय. मेहकर तालुक्यातील मेहकर व हिवरा आश्रम येथील तलाठी कार्यालय रात्री पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. तर जालना-खामगाव मार्गावरील चिखली जवळील टोल नाक्याला सुद्धा आग लावण्यात आली. सरकारने रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची अद्याप दखल न घेतल्याने कार्यकर्ते व शेतकरी आता आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा हा चौथा दिवस असून तुपकरांची प्रकृतीही खालावली आहे त्यामुळे शेतकरी व कार्यकर्ते अजूनही आक्रमक होत असल्याचा बघायला मिळत आहे.
खामगाव शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला अज्ञात व्यक्तींनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना काल सकाळी उघडकीस आली होती यात शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं असून शहर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालय जाळण्याचा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी मात्र हे प्रकरण गंभीरतेने घेतलेलं नसल्याचा समोर आल आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केली गेली नसून पोलीस फक्त चौकशी करत असल्याचं समोर आलं आहे. तर बुलढाण्यात रविकांत तुपकर यांचा सुरू असलेलं कर्जमुक्ती अन्नत्याग आंदोलनाशी या घटनेचा संबंध जोडल्या जात असल्याची चर्चा आहे.
Ravikant Tupkar: माझ्या मुलाची प्रकृती बिघडल्यास सरकार कोसळेल, सरकारला माझा तडतळात लागेल..!
सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत, मात्र अजूनही सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत चालली आहे.. आणि त्यामुळेच माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर सरकारला माझा तडतळात लागेल. सरकार टिकणार नाही. अशा उद्विग्न भावना रविकांत तुपकर यांच्या आईने व्यक्त केल्या आहेत. सरकार मायबाप असतं मात्र हे उंटावरचे शहाने होऊन बसले आहेत.
इतरमहत्वाच्याबातम्या
