Ratnagiri : रत्नागिरी (Ratnagiri)  जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली

दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच खेड तालुका प्रशासन देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. यात खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला. मृत मंगेश पाटील हे भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी आज दीड दिवसाच्या गणेशाला निरोप

मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेशाला निरोप दिला जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरच्या मध्यावर असलेल्या पवई तलावात गणपती विसर्जनाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी या तलावात दीड दिवसाचे अडीच हजार पेक्षा जास्त गणपतींचे विसर्जन झाले होते. तर मुंबईत साठ हजार पेक्षा जास्त गणपतींचे विसर्जन झाले होते. यंदा च्या वर्षी हा आकडा  वाढू शकतो. पवई तलावात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जन पाहता पालिकेने इथे 40 कृत्रिम तलाव पॉट लावले आहेत. मुंबईच्या अनेक भागात दीड दिवसांचा गणपती असतो. दीड दिवसानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते. आज राज्याच्या अनेक भागात गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. दरम्यान, राज्यातील बहुतांश गणेशाच दहा दिवसानंतरच विसर्जन केले जाते. मात्र, काही भागात दीड दिवसात केले जाते. 

महत्वाच्या बातम्या:

Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत बदल होणार? प्रत्येक मंडळासोबत एकच ढोलपथक? महत्त्वाची अपडेट समोर