Ratnagiri News : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या काही भागात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका नागरिकांसह व्यवसायिकांना बसत आहे. अशातच रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे एक अजस्त्र जहाज आढळलं आहे. यानंतर प्रशासनाकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
नागरिकांनी कोणत्याहीअफवांवर विश्वास ठेवू नये
सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वितरणाचे नियोजन व्यवस्थित सुरु असून नागरिकांनी कोणत्याहीअफवांवर विश्वास ठेवू नये किंवा गरजेपेक्षा जास्त साठा करण्याचा प्रयत्न करू नये, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेला साठा संपल्यानंतर आणि खरोखरच आवश्यकता भासली, तरच जयगड येथे थांबवलेल्या जहाजातील गॅसचा वापर केला जाणार आहे. म्हणजेच, जिल्ह्याकडे आता गॅसचा 'बॅकअप प्लॅन' तयार आहे. थोडक्यात सांगायचे तर, गॅस पुरवठ्याची ही संपूर्ण व्यवस्था आता प्रशासनाच्या थेट नियंत्रणात आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी घाबरून न जाता आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजित हालचालींमुळे ऐन वेळी उद्भवू शकणारी गैरसोय टळली असून, सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वत्र
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सणासुदींवर देखील होताना पाहायला मिळत आहे. सध्या इंधनाच्या तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळं नागरिक त्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे,
युद्धजन्य परिस्थिती मुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा झाला असल्याने,गॅस मिळविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या गरजू नागरिकांच्या कडून दलाल दाम दुपटीने पैसे उकळून गॅसचा काळा बाजार करत असल्याचं जळगाव मध्ये पाहायला मिळत आहे,फसगत झालेल्या ग्राहकांच्या समवेत चंद्रशेखर नेवे यानी बातचीत केली आहे
राज्यभरात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा
सध्या सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे राज्यभरात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने, गॅस मिळविण्यासाठी नागरिक धडपड करताना दिसत आहेत. मात्र याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी काही दलाल सक्रीय झाल्याचे देखील दिसून येत आहे. गरजू नागरिकांना हेरुन त्यांच्या कडून दाम दुपटीने पैसे वसुली करत काळा बाजार करत असल्याचं समोर आले आहे. गॅस चां काळाबाजार बाजार होत असला तरी ग्राहक आणि विक्रेता अशी दोघांना गरज असल्याने, या बाबत बोलण्यासाठी समोर कोणी येताना दिसत नसले तरी,काही जणांनी या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.