Ratnagiri Dapoli News : ख्रिसमसच्या सुट्टीसाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दापोली तालुक्यात घडली आहे. आंचल मदन सकपाळ (वय 13) असे मृत मुलीचे नाव आहे. मुंबई–कल्याण परिसरातून सकपाळ कुटुंब 25 डिसेंबर रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असताना परतीच्या प्रवासाच्या दिवशी सकाळी आंचल झोपेतच मृत अवस्थेत आढळून आली आहे.

Continues below advertisement

प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार फूड पॉयझनिंगमुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता

दरम्यान, आंचल झोपेतच मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आंचल ही कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी होती. प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस फूड अँड ट्रकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सकपाळ कुटुंब हे पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आले होते. यावेळी हे कुटुंब आंजर्ले परिसरात असणाऱ्या एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास थांबले होते. पर्यटन झाल्यानंतर हे कुटुंब तेथून सकाळी मुंबईकडे परतीच्या दिशेने जाणार होते. मात्र, सकाळीच आंचल सकपाळ या 13 वर्षीय मुलीचा झोपेतच मृत्यू झाल्याचे आढळले. यावेळी कुटुंबियांना नेमकं काय झालं हे समजत नव्हतेय त्यानंतर तातडीने आंचल सकपाळला रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिली मृत घोषीत केले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये वडील, मुलगा आणि दोन मजुरांचा समावेश आहे. गावातील गणपत साखरे यांच्या शेतात (Farmers) विहिरीतील मोटार काढण्याचं काम सुरू होतं. क्रेनच्या सहाय्याने ही मोटार बाहेर काढली जात असताना क्रेनचा वरील भाग महावितरणच्या विद्युत हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाल्याने क्रेनमध्ये करंट उतरल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात, मोटार काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ पसरली आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा