Ratnagiri: रत्नागिरी शहराजवळ आंबे काढताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील पोसरे गावातून समोर आली आहे . राजू इलम असे या युवकाचे नाव असून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात काम करणारा हा तरुण आंब्याच्या हंगामात कोकणात आंबे काढण्याची कामेही करायचा .शनिवारी ( 5 एप्रिल) शहराजवळ असलेल्या चंपक मैदानात आंबे काढत असताना लोखंडी आकडयाचा (घळ) विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने झटका लागून तरुणाचा मृत्यू झाला . (Ratnagiri)

नक्की घडले काय ?

रत्नागिरीतील खेड तालुक्यात राजू इलम या कामगाराचा आंबे तोडताना विजेच्या तारेला धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली . राजू इलम हा 30 वर्षांचा युवक शनिवारी शहरानजीक असलेल्या चंपक मैदानात आंबे काढत होता .पण आंबे काढत असताना जवळच असलेल्या विजेच्या तारेला घडाचा स्पर्श लागून त्याला जोराचा झटका बसला .5 एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजता ही घटना घडली .तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . हातावरती पोट असणारा राजू इलमहा एकुलता एक कमावता मुलगा होता .पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी तसेच आंब्याचा हंगामात आंबे काढण्याचे कामही तो करायचा . आंबे काढताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या झटक्याने तरुण खाली पडतात ही बाब आजूबाजूचा लोकांच्या लक्षात आली .त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणाला दाखल केले .मात्र तोपर्यंत उशीर झाला होता .वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणाला तपासात त्याला मृत घोषित केले .या प्रकरणाची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

महेश इलम हा मूळचा खेड तालुक्यातील रहिवासी असून, सध्या आंब्याच्या हंगामामुळे तो रत्नागिरीत कामासाठी आला होता आणि अनिल नार्वेकर यांच्याकडे कामाला होता. शनिवारी सकाळी तो चंपक मैदान परिसरातील एका आंब्याच्या झाडावर आंबे काढण्याचे काम करत होता. त्यावेळी आंबे काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी आकडीचा (घळ) स्पर्श झाडावरून गेलेल्या हायव्होल्टेज विजेच्या जिवंत तारेला झाला आणि क्षणार्धात तरुण जागेवर पडला. शॉकमुळे त्याचे सगळे अंग थरथरत होते. ही घटना घडल्याचे लक्षात आल्यावर त्याला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे रत्नागिरी हादरली असून स्थानिक हळहळ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा:

Ahmednagar Crime: डॉक्टरने तपासण्याच्या बहाण्याने 16 वर्षांच्या मुलीला गच्चीत नेलं अन् दुष्कृत्य केलं, संगमनेर हादरलं