रत्नागिरी : रत्नागिरी  जिल्हातील (Ratnagiri Bhogaon) असं एक गाव आहे की जिथे कोरोना (corona) सुरु झाल्यापासून दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण (No corona Patient in Village) नाही. हे नेमके कसे घडले आणि कोरोनाला गावच्या वेशीवरच कसे रोखण्यात यश आले? यासाठी आपल्या रत्नागिरीतला भोगाव पॅटर्न काय आहे हे समजून घ्यावं लागेल. 


ग्रामपंचायतीने केले उत्तम नियोजन
कशेडी घाटापासून अवघ्या 10 किमी अंतरावर भोगाव हे गाव आहे. या गावात जवळपास 350 घरं असून 1200 लोकांची वस्ती आहे. हे गाव ग्रामीण भागात असले तरीही गेली दोन वर्षे कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखण्यात यश आलं आहे. याचे एकमेव कारण म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीने आपल्या गावात केलेले नियोजन. ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य आणि ग्रामकृतीदल यांनी कोरोना काळात आपल्या गावकऱ्यांची घेतलेली काळजी. आपल्या गावात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझयर स्प्रे करुन त्यातूनच गावात प्रवेश करावा अशी उपाययोजना केली.


Maharashtra Coronavirus Case: राज्यात आज 25,617 डिस्चार्ज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित, राज्यात एकूण 2,04,974 ॲक्टिव्ह रुग्ण
 
कोरोनाच्या कहरामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांनाही सध्या घरातच बसावे लागत आहे. ग्राम कृती दलाने याचा विचार करुन गावात अन्न धान्य वाटप केले. 


Maharashtra Lockdown : मंत्री वडेट्टीवारांचा यू टर्न!, म्हणाले, '5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील'


एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीकडून माफ
गावकरी विश्वासाने सांगत आहेत, आमच्या गावात आजवर कोरोना बाधित एकही रुग्ण नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. घर संसाराचा गाडा चालवायचा कसा? आर्थिक अडचणीत अडकलेल्या गावकऱ्यांसाठी गावात दरवर्षी घेतली जाणारी एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीने माफ केली आहे.  गावच्या एकीमुळे कोरोनाला आपण वेशीवरच रोखू शकतो हे या भोगाव गावच्या रहिवाशांनी सिद्ध करून दाखवले आहे.


Maharashtra Unlock : लॉकडाऊन हटवण्यासाठी पाच टप्पे, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद?