मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (Maharashtra Police) पदी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची नियुक्ती झाल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली. मात्र मुनगंटीवार यांनी काही वेळातच ट्विट डिलीट केले. मुनगंटीवार यांच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण काही वेळातच  मुनगंटीवार यांच्यावर हे ट्वीट डिलीट करण्याची वेळ आली आहे. पण नेमकं असं झालं तरी काय? जाणून घ्या. 


मात्र गृहमंत्रालयाकडून या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. मात्र, याबाबत गृहमंत्रालयाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाबरोबर रजनीश शेट यांच्या अभिनंदनाचे देखील ट्विट केले होते. मात्र ते डिलीट करण्यात आलेले नाही.  मुनगंटीवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!!' 


काय केले होते ट्वीट?




रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत 


रश्मी शुक्ला यांचे नाव मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. . रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप (Rashmi Shukla Phone Tapping Case) केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.


आत्ताचे ट्विट






राजकीय वर्तुळात चर्चा


राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. रश्मी शुक्ला यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.  


हे ही वाचा :


IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा; नाना पटोंलेचा हल्लाबोल