लैंगिक अत्याचारप्रकरणी मदरसा चालक पोलिसांच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2018 06:37 PM (IST)
तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून धार्मिक स्थळी त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी परभणी शहरातील दर्गा रोड येथे धार्मिक केंद्राच्या प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी : तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून धार्मिक स्थळी त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी परभणी शहरातील दर्गा रोड येथे धार्मिक केंद्राच्या प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या ढोंगी बाबाला ताब्यात घेतलं. परभणी शहरातील दर्गा रोड भागामध्ये अल- जमियातुल गरीब नवाज मदरसा आहे. आसेफ नुरी ही व्यक्ती येथील मदरसा चालक आहे. या मदरसा चालकाने तरुणांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एका महिलेनेही या ढोंगी बाबाविरोधात पोलीस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे . ‘पूजा आणि विधी याच्या नावाखाली भावनिक बनवून हा बाबा माणसांना हे सगळं करायला भाग पाडतो. त्यानंतर संबंधिताला धमक्याही देतो. आत्तापर्यंत मी शांत बसले, पण आता माझ्यात हिंमत आली असल्याने मी समोर येऊन माझ्या वेदना मांडत आहे,’ असं तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने सांगितलं. दरम्यान, ढोंगी बाबाची एका इसमासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.