Bhokardan Nagarpalika Election Result : जालना (jalna) जिल्ह्यातील भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ( Bhokardan Nagarpalika Election Result) भाजपला जोरदार हादरा दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय झाला आहे. हा भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भोकरदनमध्ये झालेला विजय हा कोण्या पक्षाचा नाही तर सामाजिक समीकरणाचा आहे. त्यामुळं फार उत्साहीत होण्याचं कारण नसल्याचे दानवे म्हणाले. शरद पवार गटाचे नेते आणि यावर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी देखील पलटवार केला आहे.
भोकरदनमध्ये झालेला विजय हा कोण्या पक्षाचा नाही तर सामाजिक समीकरणाचा
भोकरदन नगरपरिषद निवडणूक निकालावरुन रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भोकरदनमध्ये झालेला विजय हा कोण्या पक्षाचा नाही तर सामाजिक समीकरणाचा आहे. त्यामुळं फार उत्साहीत होण्याचं कारण नाही असे म्हणत शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना टोला लगावला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या समरीन मिर्झा विजयी झाल्यानंतर दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लगेच होणार आहेत. त्यामध्ये त्यांच्या पक्षाने विजय मिळवून दाखवावा, असं आव्हान रावसाहेब दानवे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना दिलं आहे.
रावसाहेब दानवेंना जनतेने पुन्हा एकदा चपराक दिली, चंद्रकांत दानवेंची टीका
रावसाहेब दानवेंनी आतापर्यंत राजकारण केलं मात्र त्यांना भोकरदनवर पकड करता आली नाही, त्यामुळे त्यांना जनतेने पुन्हा एकदा चपराक दिल्याचे मत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी व्यक्त केले. रावसाहेब दानवे यांनी सामाजिक समीकरणावरुन केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी पलटवार केला आहे. भोकरदनचा विजय हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्यासही चंद्रकांत दानवे यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रावसाहेब दानवे यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचेही चंद्रकांत दानवे यावेळी म्हणाले.
राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले आहेत. बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने (BJP) 100 पेक्षा जास्त जागांवरील नगरपालिकेत सत्ता काबिज केली असून जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: