लातूर : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज काँग्रेसवर चौफेर टीका केली. मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्याकारणानं राहुल गांधी हे धडपडून पडलेत, अशी खिल्ली उडवणारं वक्तव्य देखील रावसाहेब दानवे यांनी लातुरात केलं. आज ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.


मागील सहा वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करुन गोरं होतं का? हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करतोय, अशी खोचक टीका रावसाहेब दानवे यांनी केली.


..म्हणून राहुल गांधी पडले : दानवे
राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते पडले. याबाबत त्यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केलं आहे. गर्दीत जाण्याची सवय नसल्याकारणाने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.


Hathras : आरएलडी कार्यकर्त्यांनी सुरक्षाकडे तोडलं; ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक


सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे खूप महत्वपूर्ण आहेत. मात्र, विरोधी पक्ष त्याला कायम विरोध करत आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत विधेयक पास केलं आहे. मात्र, राज्य सरकारने हे विधेयक आम्ही आमच्या राज्यात लागू करुन घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. कायदा जर पाळला नाही तर त्याचे परिणाम होतील ते पुरवायला सरकारने तयार असावं, असे दानवे म्हणाले.


काय आहे घटना?
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.


Hathras Case | मुलींवर योग्य संस्कार नसल्याने बलात्कार; भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांची मुक्ताफळं