Ramdas Kadam on Bhaskar Jadhav : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोकणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रामदास कदम यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. भास्कर जाधवचा तोल गेलाय त्यामुळे त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भास्कर जाधव यांचा मेंदू सडलेला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज असल्याचे मत कदम यांनी व्यक्त केले.   

भुंकणाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही

गुहागर मतदार संघात सगळ्या ठिकाणी त्यांना पराभव दिसत असल्याने ते भुंकत आहेत. भुंकणाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असी टीका कदम यांनी जाधव यांच्यावर केली. त्याला 1995 ला आमदारकीची सीट मी मिळवून दिली. शिवसेनेत मी आणल्याचे कदम म्हणाले. माझ्या गावातील भक्ताकडे भास्कर जाधव यांची बायको यायची असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. मी कधी काळी विद्या केली हे सिद्ध करून दाखव असे आव्हान देखील कदम यांनी जाधवांना दिले. भास्कर जाधव यांचा मेंदू सडलेला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज असल्याचे देसाई म्हणाले.  

नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव?

रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कुठेही गेले तरी दुसऱ्याच्या नावाने शिव्या देतो. गाढवाला गुळाची चव काय? अशी रामदास कदमांची स्थिती आहे, रामदास कदम यांनी चांगली चरित्र वाचावी असे जाधव म्हणाले. रामदास कदम याला मी एकेरीच बोलणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. माझा मुलगा कष्ट करून मोठा झाला आहे. तुम्ही हप्तेखोर, हप्ते खाता, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला. मुंबईतील बार चा उल्लेख करतजाधवांनी पुन्हा टीका केली. रामदास कदम हा माणूस आहे की कोण हेच कळत नाही. रामदास कदम ही विकृती असल्याचे जाधव म्हणाले. खेडमधील सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली. रामदास कदमने सख्ख्या भावाला जेलमध्ये टाकलं होतं अशी टीका देखील भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर केली होती.