Ramdas Athawale on Jayant Patil : जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडलं आहे. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने नवीन प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुतीसोबत आलं पाहिजे. मी मध्यस्थी करुन त्यांना राष्ट्रवादीत आणायला करायला तयार असल्याचे आठवले म्हणाले.
नेमकं काय म्हगणाले रामदास आठवले?
जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला असेल तर आणि विकास करायचा असेल तर सत्येसोबत आलं पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करुन त्यांना राष्ट्रवादीत आणायला करायला तयार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. ते वाळवा इथे आले होते. यावेली त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांनी महायुतीत यावं अशी ऑफर दिली आहे.
शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.
शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द?
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले. 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. सन 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या: