33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोने, रमाबाई आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी 39 कोटींची साडी
मुंबई : रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून 39 कोटींची साडी बनवण्यात येत आहे. या साडीसाठी 33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे.
मुंबई : रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून 39 कोटींची साडी बनवण्यात येत आहे. या साडीसाठी 33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही साडी बनवली आहे. संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा चढवण्यात येत आहे. माता रमाई यांच्या कपाळावरील कुंकवाच्या जागी 33 कोटींचे हिरे लावण्यात येणार आहेत.
रोहित पिसाळ हे उद्योजक आहेत. समुद्रा खाली खनन करून ते सोने शोधण्याचा व्यवसायात करत आहेत. पिसाळ यांच्या संपूर्ण कार्यालयात अस्सल सोन्याने रंगविलेल्या कलाकृती आहेत. त्यात पेंटिंग्स, कपडे, साइकल, बूट आणि बऱ्याच गोष्टी आहेत. सोन्याचा भाव गगनाला भिडला असताना त्याच रंग म्हणून वापर करून अनेक गोष्टींना नवी शोभा देण्या मागचा हेतू काय? कल्पना काय? आणि विशेष म्हणजे 39 कोटींची साडी तयार कशी होणार याबाबतची माहिती पाहुयात.
माझा प्रवास हा ऐक्सीडेंटली सुरु झाला आहे. मी गोल्ड रिफायनिंगमध्ये आलो. आता गोल्डमध्ये आज एक डिज़ाइन असेल ते उद्या नसेल. आपल्याकडे वेगवेगळ्या आईडिया असतात मला कॉम्पीशनमध्ये नव्हते. मला वेगळे तयार व्हायच होते म्हणून मी कपड्यांमध्ये आलो मी कपड्यांना अॅसेट केले. मी लग्नाला एवढे महागडे कपडे घेतो पण नंतर ते वापरात येत नाहीत. पण त्यात काही सोने असेल ते 25 वर्षांनी किती महाग होईल. सोन्याला ब्रँडची गरज नाही ते स्वत ब्रांड आहे म्हणून मग मी गोल्ड चे कपडे शूज सुरू केले आता गोल्ड नगेट्स सुरू केले आहे. तुम्ही 5 ते 10 हजार चे इन्वेस्टमेंट करू शकता दर महिना मी गोल्ड क्रीम ही तयार करत आहे. मी प्रयत्न करत आहे की गोल्ड सगळ्यामध्ये यावे. आमचे कपडे गोल्ड फॉइलमध्ये तयार होतात. मला आवड आहे मी स्वतः एका वेगळ्या प्रकारचे कपडे बूट घालतो मी फॅशनला गोल्ड सोबत आणण्याच प्रयत्न करत असल्याची माहिती रोहीत पिसाळ यांनी दिली.
ज्या मातेनं त्यागानं एवढं सगळं उभं केलं तिचा पदर मला हिऱ्याने सजवायचाय
39 कोटी रुपयांची साडी बनवण्याच्या मागे माझे ध्येय होते. बाबासाहेबांनी ज्या काळात घर नव्हती तेव्हा हिंदू कॉलनीमध्ये राजगृह उभे केले. ज्या मातेने त्यागाने एवढे मोठे सगळं उभे केले तिचा पदर मला हिऱ्याने सजवायचा आहे असे रोहीत पिसाळ म्हणाले. 33 कोटी देव आहेत ते म्हणजे निसर्ग त्यांनी मला किती दिले माहीत नाही पण बाबासाहेबांनी सगळे दिले आणि त्यामुळं 33 कोटी तिच्या मातेवरचे कुंकू म्हणून 33 कोटीचे हिरे लावण्यात आले आहेत. माझी साडी अल लक्ष कंपनी ने 100 कोटी ट्रेडमध्ये घेतलेली आहे. वरचे पैसे हे मी समाजसेवा करण्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर बॅकिंगम पैलेसला ही साडी जाणार असल्याची माहिती रोहीत पिसाळ यांनी दिली. बाबासाहेब आणि रमामाता हे आदर्श आहेत. बाबासाहेब घडवण्यासाठी तुम्हाला रामजीसारखा बाप लागतो जो राशन नसेल तरी पुस्तक आणतो आणि रमाई सारखी आईही लागते. बाबासाहेब लंडन मध्ये एक मैत्रिणीला म्हणाले होते मी untouchable आहे. लंडनवरुन भारतात आल्यावर त्यांनी संविधान लिहिले त्यावेळी त्यांची मैत्रीण म्हणाली की येस आंबेडकर यू आर untochable नो वॉन टच u विद दिस नॉलेज मला तसे व्हायचे आहे.
























