Rajya Sabha Election 2024 : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत महायुतीमधील नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. अशोक चव्हाणांची वर्णी लागणार का? अशीही चर्चा रंगली आहे. उमेदवार निश्चितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत महायुतीच्या राज्यसभेतील खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  


राष्ट्रवादीत एका राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक


उमेदवारी निश्चितीचा घोळ सुरु असतानाच महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरला आहे. 15 फेब्रुवारी रोजी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे, अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज (13 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर आजही शिक्कामोर्तब झालं नाही. एका राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक आहेत. 


राष्ट्रवादीमध्ये कोणाची नावे चर्चेत


आजच्या बैठकीत उमेदवारी अर्जावर आज केवळ सूचक म्हणून आठ आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या. उद्या (14 फेब्रुवारी) पुन्हा एकदा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे. अजित पवार गटातून राज्यसभेसाठी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, आनंद परांजपे अविनाश अदिक, इद्रिस नायकवडी, माजी मंत्री नवाब मलिक तसेच नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या बाबा सिद्दिकी यांच्यासह आणखी 3 जण इच्छूक आहेत. 


शरद पवार शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही!


महायुतीमध्ये काथ्याकूट सुरु असातनाच महाविकास आघडीकडून शरद पवार यांनी राज्यसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीसाठी आग्रह केला आहे. मविआत सर्वाधिक आमदार असल्याने काँग्रेस आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. . महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास तो मास्टरस्ट्रोक ठरु शकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या



 


 


इतर महत्वाच्या बातम्या