अहमदनगर: 'महाराष्ट्राचे मांझी' अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्यावर गावातील गुंडांनी हल्ला केला आहे.
गावात दारुबंदीचा प्रचार केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी गुंडेगावताच त्यांच्यावर हा हल्ला झाला.
गावगुंडांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे, वयोवृद्ध भापकर गुरुजी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली आहे.
याबाबत भापकर गुरुजींनी पोलिसात धाव घेतली असून, तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत आहेत .
कोण आहेत भापकर गुरुजी?
राजाराम भापकर गुरुजींचं वय वर्षे 88 आहे. त्यांनी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करुन गुरुजींनी गावात रस्ते तयार केले. माझानं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना माझा सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं.
महाराष्ट्राच्या या मांझीची ओळख ‘एबीपी माझा’ने जगाला करुन दिली होती.
संबंधित बातम्या
महाराष्ट्राच्या मांझीचं यश, गुंडेवाडी ते पुणे थेट बससेवा
भापकर गुरुजी... महाराष्ट्राचा माऊण्टन मॅन