Chandu Mama On Raj & Uddhav Thackeray : मी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही प्रमुखांचे वक्तव्य ऐकले आहे. मला आनंदाची बातमी मिळाली, मी समधानी आहे. आता हे दोघे एकत्र आले तर लेट बेटर दैन नेवर. झालं गेलं गंगेला मिळालं, असे होऊन दोघांची मने एकत्र होत असतील तर चांगलीच गोष्ट असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा (Chandumama) यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या ज्या अटी शर्ती आहेत, त्याला सुध्दा पर्याय आहे. आपण शुभ बोलू, महाराष्ट्राला चांगले दिवस येतील हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना असे चंदूमामा म्हणाले.
राजकारणाच्या खोळात मी जाणार नाही
दोघेही भाचे एकत्र येणे चांगले आहे. कोण राज्य करेल नाय करेल मी खोलात जाणार नाही. पण शेवटी राज्य येईल आणि मराठी माणसाचे चांगले होईल असे चंदूमामा म्हणाले. युती का होत नाही याचं कारण समज गैरसमज आहेत. पण आज दोघांनी संगितले चिल्लर गोष्टी बाजूला करायला तयार आहेत असे चंदूमामा म्हणाले. साहेबांना यामुळ शांति मिळेल. माणसाने आशावादी राहावे, काही कारणास्तव वेळ लागला पण आता सूर्य प्रकाशाची अंधुक किरणे दिसू लागली आहेत. आपण त्याला नमस्कार करुन सूर्य लवकर उगवेल प्रार्थना करुया असे चंदूमामा म्हणाले.
दोन भाचे भांडत असतील तर कुठल्याही मामाला आवडणार नाही
कुठल्याही मामाला दोन भाचे भांडत असतील तर ते आवडत नाही. भावना ज्या असतात प्रत्येक वेळी सांगायच्या नसतात बॉडी लैंग्वेजमध्ये दिसते. माझ्या पुस्तकात नवे बॉम्ब नसतील पण इतिहास असेल. कुटुंबाचा इतिहास असेल लहानपणापासून मी पाहिले साहेबांनी किती प्रेम केले, या पुस्तकात आठवणीचे उजळे असतील, साहेब किती मोठे हे प्रत्यक्ष मी पाहिले आहे. माझे लग्न झाले त्यासाठी मी साहेबांना धन्यवाद देतो. हटाव लुंगीचे आंदोलन सुरू होते आणि तेव्हा मी दाक्षिणात्य मुलीसोबत लग्न केल्याचे चंदूमामा म्हणाले. आमच्या माँ साहेब मराठी माणसाच्या आशिर्वादाने हे सगळं सुरू आहे असे चंदूमामा म्हणाले. सगळ्या गोष्टी शब्दात सांगता येत नसतात. भावना दाखवता येत नाहीत. बॉडी लँग्वेजवरुन काही गोष्टी कळतात असे चंदूमामा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: