Raj Thackeray: मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही अशी मजुरी दाखवल्यानंतर पण मीरा-भाईंदरमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी दणका दिल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र मराठी मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. आता या सर्व संतापविरोधात राज ठाकरे सुद्धा मीरा-भाईंदरमध्ये पोहोचणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जो मुद्दा गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिला जात आहे त्या मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता आहे.
राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये काय बोलणार?
मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापारांची मुजोरी चांगली चर्चेत आहे. मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी या गरळ ओकणाऱ्या प्रवृत्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यापक मोहीम हाती घेत दणके देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून दबाव तंत्राचा वापर केला होता. त्या मोर्चाला भाजपकडून रसद पुरवण्यात आल्याचा आरोप सुद्धा झाला. मात्र त्याच ठिकाणी मराठी मोर्चाला मात्र परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे संतापाची एक लाट पसरली होती. या वादानंतर परवानगी नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली होती. या सर्व वादानंतर राज ठाकरे उद्या पण मीरा-भाईंदरच्या दौऱ्यामध्ये काय बोलणार याकडे लक्ष असेल. उद्या (18 जुलै) सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये पोहोचणार आहेत. राज ठाकरे मराठी विजय मेळावा झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम असेल. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची सुद्धा चर्चा रंगली आहे. ही चर्चा रंगात आली असतानाच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीवर आपल्या परवानगीशिवाय बोलण्यास नकार दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या