पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 21 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी संध्याकाळी पाच वाजता पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मैदानावर ही बहुप्रतीक्षित मुलाखत होणार आहे.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. 'शोध मराठी मनाचा' या संमेलनाच्या निमित्ताने ही खुमासदार मुलाखत विनामूल्य पहायला मिळणार आहे.
यावेळी शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष मुलाखतीच्या निमित्ताने वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.