मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकनंतर आता ट्विटरवरही दणक्यात एन्ट्री घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंनी सोशल मीडियाचा वापर अधिक वाढवला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे त्यांची ट्विटरवरील एन्ट्री होय.
आपल्या फेसबुक पेजचे दिमाखदार कार्यक्रमात राज ठाकरेंनी उद्घाटन केले होते. त्यानंतर त्यांनी जगभरातील महत्त्वाच्या माहितीच्या लिंक्स असो किंवा विविध विषयांवरील आपली मतं असो, किंवा देशातील निवडक महत्त्वाच्या घटनांवरील व्यंगचित्र असो, ते पोस्ट करतात. फेसबुकवर त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
फेसबुकवर राज ठाकरे यांच्या पेजला 7 लाख 80 हजाराहून अधिक लाईक्स आहेत. तिथे पोस्ट केलेल्या प्रत्येक पोस्टला तुफान प्रतिसाद मिळतो. आता फेसबुकनंतर राज ठाकरेंनी ट्विटरवर पदार्पण केले आहे.
ट्विटरवर राज ठाकरे यांचे @RajThackeray असे ट्विटर हँडल असून, ते व्हेरिफाईड अकाऊंट आहे. सध्यातरी राज ठाकरे कुणालाही फॉलो करत नसून, त्यांचे फॉलोअर्स मात्र वेगाने वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी अद्याप कोणतेही ट्वीट केलेले नाही. एमएनएस अधिकृत या मनसेच्या अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्या ट्विटर एन्ट्रीची माहिती देण्यात आली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांसह अनेक ट्विटराईट्सनी राज ठाकरेंच्या अकाऊंटवर उड्या घेतल्या.
फेसबुकनंतर राज ठाकरेंची ट्विटरवरही एन्ट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2018 08:48 PM (IST)
फेसबुकवर राज ठाकरे यांच्या पेजला 7 लाख 80 हजाराहून अधिक लाईक्स आहेत. तिथे पोस्ट केलेल्या प्रत्येक पोस्टला तुफान प्रतिसाद मिळतो. आता फेसबुकनंतर राज ठाकरेंनी ट्विटरवर पदार्पण केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -