मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना (Residents near Elphinstone Bridge) घरे (Houses) खाली करण्याची नोटीस शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, घरांची पुढील परिक्रमा कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत. यानंतर स्थानिक लोकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन व्यथा मांडली. यावेळी राज ठाकरेंनी नागरिकांना धीर दिला आहे. "जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलुन घ्या! असे राज ठाकरे म्हणाल्याची माहिती मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत
एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर या नागरिकांना स्थलांतरीत घरे कुठे देणार याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं या नागरिकांना आज राज ठाकरे यांची भेट घेतली. राजसाहेबांनी या प्रकरणात नागरिकांना धीर देऊन "जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबीही दिली असल्याची माहिती माजी आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. राजू पाटील यांनी ट्वीटरवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचा फोटो देखील राजू पाटील यांनी शेअर केला आहे.
एल्फिन्स्टन पूल प्रकल्पामुळे 19 इमारतींंपैकी 2 इमारतीमधील नागरिक बाधित होणार आहेत. या रहिवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने त्यांना त्याच ठिकाणी पुनर्विकसित घरे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने ही जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडे सोपवल्याची देखील माहिती मिळत आहे. सुधारित सरकारी योजनेमुळे, फक्त दोन इमारती थेट प्रभावित होतील, ज्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav-Raj Thackeray Alliance : वेळ आली आहे एकत्र येण्याची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोस्ट, मनसेसोबत युती दृष्टीक्षेपात?