Raj Thackeray On EVM : ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार आहेत. गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय. केळाला मत दिलं पण गेलं कलिंगडला, असे म्हणत राज ठाकरे यांनी मेळाव्यात EVM घोटाळ्याचा LIVE डेमो दाखवला. लोकं आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रुपांतर होतं नाही. पण या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणूक मशीनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
ज्यासाठी देशभर प्रत्येक मतदाराच्या मनात, राजकिय पक्षाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाली आहे. निवडणुक मशीनकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवे तसे वागायचे. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत मतदार याद्या स्वच्छ करा. 1 वर्ष आणखी निवडणुका घेऊ नका असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मतदार याद्या स्वच्छ झाल्या की घ्या मग, त्यावेळी पराभव आम्ही स्विकारतो असे राज ठाकरे म्हणाले. मॅच फिक्स आहे. मुख्य निवडणूक आयोग सांगतात की सीसीटिव्ही ही प्रायव्हसी आहे. जे पटत नाही पचत नाही अशी उत्तर देतात. मग निवडणुका घेतात सत्तेत आल्यावर हवे तसे वागायचे. या सर्व शहरांवर यांचा डोळा आहे. स्वाभिमान गहाण टाकायचा याला काही मर्यादा असे राज ठाकरे म्हणाले.
एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे
दरम्यान, एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या असे राज ठाकरे म्हणाले.
जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर अधिक तीव्रतेने या विरोधात ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष या विरोधात एकत्र भूमिका जाहीर करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: