हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे. या पुराचा फटका कुरुंदा, आंबा, सेलू  या गावांना बसला. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे.   कुरुंदा गाव जलमय झालंय. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. यात 10 ते 15 घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पुरामुळे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे.
या पुराच्या पाण्यामुळे दिवसा शेतात काम करण्यासाठी गेलेले काही जण शेतातच अडकून पडले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या आखाड्यांवरील जनावरे वाहून गेली आहेत.   हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्हालळे परिसरात रात्रीतून 103 मि.मी. पावसाची नोंद झाली.
यवतमाळमध्येही जोरदार पाऊस   यवतमाळमध्ये आज जोरदार पाऊस झाला.  यामुळे काही काळ घोटी गावजवळच्या पुलावरुन पाणी वाहतं होतं.. यवतमाळबरोबरच वर्ध्याच्या काही भागातही सरी बरसल्या आहेत. ज्या पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसलाय, त्याठिकाणी खोळंबलेल्या पेरण्याही सुरु झाल्या आहेत. आज या घडीपर्यंत विदर्भ वगळता राज्यात इतरत्र फारसा पाऊस नाही.