Yavatmal : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील दारव्हा शहरातील वर्धा-नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात (Wardha-Nanded railway station area) बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्डयात चार मुले बुडाल्याची घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. रीहान असलम खान (13) गोलु पांडुरंग नारनवरे (10) सोम्या सतीश खडसन (10) वैभव आशीष बोधले (14) रा.सर्व दारव्हा अशी मृत लहान मुलांची नावे आहेत.
घटनेची माहिती काही नागरिकांना मिळताच नागरिकांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र मुलांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
घटना नेमकी कशी घडली याबाबतची माहिती अद्याप समजलेली नाही
दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याबाबतची माहिती अद्याप समजलेली नाही. ही मुले नेमकी त्या ठिकाणी का गेली होती. घटना कशी घडली याबाबतची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर बुडालेल्या सर्व चारही मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं आहे.
वर्धा जिल्ह्यातही कारचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील खडकी इथं कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला तर एका पंचवीस वर्षीय युवकाचा समावेश आहे. वर्ध्याहून नागपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना तुळजापूर नागपूर मार्गावर खडकी नजीक सामाजिक वनिकारणच्या नर्सरीजवळ घडली आहे. वर्ध्याच्या जुनघरे परिवारातील सदस्य हे नागपूर येथे कारने जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन महिला तर एक पंचवीस वर्षाचा तरुण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदणासाठी पाठवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या: