रायगड : बहुतांश व्हॉट्सअॅप ग्रुपवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पा, विनोद फॉरवर्ड करणं असे प्रकार होतात. मात्र रायगडमधील एका ग्रुपने मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील तब्बल 700 अपघातग्रस्तांना जीवदान दिलं आहे.


खोपोलीतल्या गुरुनाथ साठेलकर यांनी दोन वर्षांपूर्वी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु केला. साठेलकर आणि त्यांच्या मित्रांनी सुरु केलेल्या या ग्रुपमध्ये सध्या 203 सदस्य आहेत. एक्स्प्रेस वे वर कधीही अपघात झाला की हे बचाव पथक तातडीनं तिथे धाव घेतं.

कधी दरीत, कधी धरणात, तर कधी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी या ग्रुप नेहमीच पुढे असतो. गेल्या दोन वर्षांत या ग्रुपच्या मदतीनं 700 हून अधिक अपघातग्रस्तांना जीवदान मिळालं आहे.

रात्री अपरात्री एखादा अपघात घडल्यास धावून जाणाऱ्या 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' ग्रुपमध्ये डॉक्टर, पोलिस, व्यावसायिक, पत्रकार आणि समाजसेवकापासून स्थानिक रहिवाशांनी व्हॉट्सअॅपच्या या ग्रुपला साथ दिली आहे.