एक्स्प्लोर

रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर येथे पर्यटनासाठी बंद; धरण, धबधबे परिसरातील सुमारे 32 ठिकाणी पर्यटकांना बंदी

Raigad News : कर्जत परिसरात सुमारे 18  पर्यटन स्थळ असून खालापूर हद्दीत 14 पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटक हजेरी लावत असतात. दरम्यान, या सर्व धबधबे , धरणे आणि तलावांच्या ठिकाणी पर्यटक येत आहेत.

 रायगड  :  पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच अनेक पर्यटक हे कोकणातील धरणे, धबधबे परिसरात पर्यटनासाठी जातात.  मुंबईनजीक असलेल्या  रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर येथील धरण आणि धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.  पावसाळ्यात होणारे अपघात पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांत पावसाळ्यात धरणाच्या जोरदार प्रवाहामुळे अनेकांचे बळी गेले होते.

मुंबईनजीक असलेल्या रायगड जिल्ह्यातील धरणे आणि धबधबे हे पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. त्यातच, अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेले कर्जत आणि खालापूर परिसरतील झेनिथचा धबधबा, कर्जतजवळील आषाणे - कोषाणे , सोलनपाडा  आणि पाली -भूतीवली धरण हे पर्यटकांच्या आकर्षणाचे धरण आहेत. यामुळे, या परिसरात मुंबई, ठाणे, पुणे परिसरातील बहुतांश पर्यटक हे एक दिवसीय सहलीसाठी मोठया प्रमाणात हजेरी लावत असतात. 

त्यातच, कर्जत परिसरात सुमारे 18  पर्यटन स्थळ असून खालापूर हद्दीत 14 पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटक हजेरी लावत असतात. दरम्यान, या सर्व धबधबे , धरणे आणि तलावांच्या ठिकाणी पर्यटक येत असून काही ठिकाणी पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच या परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये, या परिसरालगतच्या एक किलोमीटर क्षेत्रात कलम 144(1) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. यामध्ये, 10 जून ते 9 ऑगस्ट या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 

खालापूर येथील धामणी कातकरवाडी तलाव, आडोशी धबधबा, मोरबे धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, झेनिथ धबधबा, कलोते धरण या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तर, कर्जत येथील खांडस धरण, आषाणे- कोषाणे धबधबा, साळोख धरण, पाली - भूतीवली धरण, जुमापट्टी धबधबा, पळसदरी धरण हे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 

यामध्ये, पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे, मध्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे आणि वाहतूक, अनधिकृत मद्यविक्री करणे व उघड्यावर मद्यसेवन करणे यावर बंदी घालण्यात आले आहे.  तर, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे अशा ठिकाणी सेल्फी काढण्यास, खोल पाण्यात पोहणे आणि उतरणे यावर बंदी करण्यात आली आहे. 

तसेच, सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभय वर्तन आणि छेडछाड करणे,  मोठ्या आवाजात स्पिकर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकंSaif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget