Raigad Rain : मुसळधार पावसाची दाहकता; हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; तर पालघरमध्ये लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात
Raigad Rain News : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील एमटीडीसी (MTDC) बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Raigad Rain News : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील एमटीडीसी (MTDC) बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात आणि वादळात हा मृतदेह महाड परिसराकडून सावित्री नदीच्या पात्रातून वाहून आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
Palghar Rain News: लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात अडकलं; धक्कादायक व्हिडिओ समोर
पालघर मध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात एक कुटुंब लहान चिमुकल्यांसह आठ जण तब्बल चार तास घराच्या छतावर अडकून पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे . पालघरच्या केळवे परिसरातील देवीपाडा येथील हा व्हिडिओ असून घराला चारही बाजूने पाण्याने वेढा घातल्याने या कुटुंबाने घराच्या छताचा भर पावसात आसरा घेतला . यामध्ये काही चिमुकली मुल देखील घरावर अडकून पडली असून चार तास कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे . दरम्यान चार तासानंतर परिसरातील पाणी ओसरल्यानंतर हे कुटुंब आपल्या चिमुकल्यांसह छतावरून खाली आलं असून आलेल्या पुरामुळे घरासह घरातील साहित्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं समोर आल आहे.
Raigad: रोहा रेल्वे उड्डाण पुलाखाली असलेल्या खड्ड्याने घेतला 32 वर्षीय तरुणाचा जीव; मृत व्यक्ती भातसई गावचा पोलीस पाटील
रायगडच्या रोहा रेल्वे उड्डाणपूलाचे काम गेले तीन ते चार वर्ष सुरू आहे. त्यामुळे अष्टमी ते मेढा मार्गांवर मूळ रस्त्याला खड्डेच खड्डे असून खड्ड्यांमध्ये अनेक वेळा अपघात होऊन काहींना अपंगत्व तर काहींनी जीव गमावले. आता पुन्हा याच मार्गावर पुन्हा एका मोटारसायकल वाहन चालकाचा खड्ड्यात आदळून अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. या अपघातात 32 वर्षीय तरुण संकेत जनार्दन कोतवाल हे याच मार्गावरून जात असताना तोल जाऊन कोसळले आणि याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव एसटी खाली चिरडले गेले. यामध्ये संकेत कोतवाल यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीसानी घटना स्थळी धाव घेतली. परंतु नातेवाईकांनी रोहा रुग्णालयातून संकेत यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला, जोपर्यंत मृत व्यक्तीस योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाहीं असा पवित्रा येथील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्यावेळी घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
महत्त्वाच्या बातम्या





















