Raigad Rain News : राज्यभरात गेल्या 24 तासांपासून पावसाने (Maharashtra Rain) रौद्ररूप धारण केले असून अनेकभागात पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केली आहे. याअंदाजानुसार रायगड जिल्ह्यालामुसळधार पावसानेअक्षरशःझोडपून काढले आहे. परिणामी रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर रायगडच्या उत्तर भागात पुर सुदृष्य परिस्थिती निर्माणझालीआहे. दुसरीकडे पेण, नागोठणे, पाली, रोहा परिसरात देखील पुर सदृष्य परिस्थिती निर्माणझालीअसूनजनजीवनविस्कळीतझालेआहे.
दरम्यान, पुढीलकाहीतासात पावसाचा जोरवाढण्याचीशक्यताअसूननदीकाठाच्यापरिसरातीलनागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सुचना देण्यातआल्याआहे. मात्र जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे रायगडजिल्ह्यातील जनजिवन विस्कळीत झाल्याचेचित्रआहे.
Raigad Rain News: ST बसमध्ये आडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका; कर्जत–पेण मार्गावरील घटना
अशातच, रायगडच्या रसायनी येथे ST बसमध्ये आडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यातआलीआहे. हिबस पुराच्या पाण्यात आडकली होती. शिवाययाएसटीबसमध्ये एकूण आठ प्रवासी अडकून पडले होते. कर्जत–पेण मार्गावरील सारसई येथील हि घटना असून पाताळगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात हिबसअचानक आडकली होती.
Raigad Rain: रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम,अनेक नद्यांनी ओलांडली धोका पातळी, मुंबई-गोवा महामार्ग 7 तासांपासून ठप्प
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, या नद्यांनी आपली पातळी ओलांडली असून अनेक सकळ भागात पाणी शिरले आहे.शिवाय अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कर्जत, नागोठणे, खोपोली, रोहा या शहरामध्ये सध्या पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे मुंबई गोवा महामार्ग देखील मागील 7 तासांपासून ठप्प असून अनेक वाहने मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडली आहेत.
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस बरसतोआहे. या पावसामुळे वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होतअसून चिपळूणच्या जुना बाजार पुलाला नदीचे पाणी टेकले आहे. समुद्राला भरती असल्यामुळे वाशिष्टी नदीच्या पुराची चिंता आतावाढूलागलीआहे. दरम्यान, चिपळूणमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आलेआहे. तर जुना बाजार पुलावर पाण्याची पातळी सध्या 3.10 वर गेलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
