Bharat Gogawale : रायगडमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. रायगड जिल्हा परिषदेत शिंदे सेनेला सत्तेपासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच मुद्यावरुन मंत्री भरत गोगावले आक्रमक झाले आहेत. महायुती मध्ये एकत्र यायचे असेल तर एकत्र जाऊ, अन्यथा पुढे वेगळा विचार करु, अशा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला आहे.
आमची गरज नसेल तर यापुढे आम्ही वेगळा विचार करु
आमची गरज नसेल तर यापुढे आम्ही वेगळा विचार करु असा सज्जड इशारा मंत्री भरत गोगावले यांनी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपला दिला आहे. रायगडमध्ये शिंदेसेनेला सत्ते पासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करत आहेत. यावर गोगावले यांनी शिवसेनेची बाजू मांडत युती पक्षांना इशाराच दिला आहे. महायुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचे आहे असा सल्ला गोगावले यांनी यावेळी दिला. त्यामुळं वरिष्ठ गोगावले यांच्या वक्तव्याचा किती विचार करतील हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या अनुशंगाने रायगडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलचं तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे गट नोंदणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती सत्ता स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षांकडे बहुमत असल्याने तिसऱ्या पक्षाला सत्तेत समावून घेण्याची गरज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. तरीपण सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आता शिंदेच्या शिवसेनेनी वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षावर दबाव टाकण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्षामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यानुसार या निवडणुकीत महायुतीने रायगडमध्ये (Raigad News) वर्चस्व राखले असून ठाकरे गट आणि काँग्रेसला अत्यंत माफक यश मिळाले.
महत्वाच्या बातम्या: