रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह, परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल
रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील माणगांव मधील गारळ गावाच्या तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे.
Raigad : रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील माणगांव मधील गारळ गावाच्या तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ पसरली आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव टिमकडून या तलावातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्खळी दाखल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील माणगांव मधील गारळ गावाच्या तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नेमका बुडून झाला आहे दुसरं काही आहे याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. माणगांव पोलिसांकडून आता व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव टिमकडून या तलावातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.























