Raigad : रायगड जिल्हा परिषदेतील एका आर्थिक घोटाळा प्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्याच मेव्हण्याच्या घरात दिवाळीच्या मुहूर्तावर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये महिला व बालविकास विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारात ज्योतिराव वरुडे यांच्यासह तिघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मानसिक त्रास झाल्याच्या उद्देशाने वरुडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.
आज, दीपावलीच्या दिवशी त्यांनी अलिबागजवळील विद्यानगर येथे विष प्राशन करुन टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर वरुडे यांना उपचारासाठी अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरुडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ही आत्महत्या आर्थिक दबावाखाली केल्याची चर्चा आहे. या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या: