Raigad Khopoli News : रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्कीझाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पाच ते सहा तास झाले जमाव हटण्याच्या मनःस्थितीत नाही. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. आरोपीला त्वरीत अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.
पाच ते सहा तास झाले जमाव खोपोली पोलीस स्टेशनसमोर बसून आहे
खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडल्यामुळं तणावाची स्थिती आहे. पाच ते सहा तास झाले जमाव खोपोली पोलीस स्टेशनजवळ आहे. येथील जमाव हटण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळं पोलीसांसोबत बाचाबाची झाली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
खोपोली मधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते भरत यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे अशा एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल आहे. सुधाकर घारे हे सुनिल तटकरे यांचे समर्थक असून त्यांनी कर्जत विधानसभेत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढली होती. या वेळी पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
मंगेश काळोखे यांची आज सकाळी 7 वाजता निर्घुण हत्या झाल्याची
खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची आज सकाळी 7 वाजता निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रसंगी हल्लेखोरांना प्रत्यक्षदर्शी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी पाहिले असता जे हल्लेखोर काळया रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. खोपोली पोलिस या हल्लेखोरांचा शोध घेत असून मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे याबाबतीत पोलिस अधिक माहिती घेत आहेत. मंगेश काळोखे यांची आज सकाळी सात वाजता हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानतंर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: