Raigad Accident News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ऑटो रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत एक तरुणाचा जागीच मृत्यू  झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कर्जतमधील मोठे वेणगाव परिसरात हा अपघात घडला आहे. कर्जत वेणगाव मार्गावरील मुख्य वळणावरुन जात असताना ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाल्यानं हा भीषण अपघात झाला.  

Continues below advertisement

अपघातात बाळा अरुण वाघमारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोटारससायकल चालक संतोष हिलम आणि ऑटो रिक्षातील चालक आणि एक प्रवाशी जखमी झाला आहे. जखमींवर कर्जत मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Mirzapur Train Accident : रेल्वे लाईन क्रॉस करताना भरधाव ट्रेनची धडक, गंगा स्नानसाठी गेलेल्या सहा भाविकांच्या चिंधड्या