Raigad Accident : रायगडच्या घोणसे घाटात भीषण (Raigad Accident News Latest Update)अपघात झाला आहे. एक बस 60 ते 70 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काही जण श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. अश्विनी शैलेश बिरवाडकर, सुशांत रिकामे, मधुकर बिरवाडकर अशी बस अपघातातील मृतांची नावे आहेत.


आज सकाळच्या सुमारास नालासोपारा येथुन श्रीवर्धनकडे निघालेल्या खाजगी बसचा भीषण अपघात झाला . या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू  झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत.  शनिवारी रात्रीच्या सुमारास मुंबईतील नालासोपारा येथील रहिवासी हे खाजगी बसने म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील रहिवासी हे सुट्टी निमित्त त्यांच्या गावी निघाले होते. यामध्ये, धनगरमलाई , बोर्ली, खुजारे, नागलोली येथील रहिवासी हे सुट्टी निमित्त गावी निघाले होते. 


याचदरम्यान, आज सकाळच्या सुमारास म्हसळानजीक असलेल्या घोणसे घाटातील उतारावरील तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात ही बस सुमारे 60 ते 70 फूट खाली कोसळल्याने बसमधील तिघांचा मत्यू झाला तर अन्य प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.


या अपघाताची माहिती मिळताच जवळच्या गावातील रहिवाशांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढले आहे. तर, या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना म्हसळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, गंभीर जखमी प्रवाशांना माणगाव, महाड आणि अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या अपघातात एका महिलेसमवेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून बसमधील 33 प्रवासी जखमी झाले आहेत.