ठाणे: पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणाऱ्यांवर ठाणे क्राईम ब्रांचने सुरु केलेली कारवाई कायम आहे. या कारवाई अंतर्गत महाराष्ट्रतील 7 जिल्ह्यांमध्ये 44 पेट्रोल पंपांवर छापेमारी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे त्यातील 30 पेट्रोल पंपांवर 'मापात पाप' केलं जात असल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसांनी रविवारी 6 तंत्रज्ञांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या तंत्रज्ञांनी हातचलाखी करण्यासाठी पेट्रोल मालकांना मदत केली होती. पोलिसांनी पकडलेले 6 तंत्रज्ञ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली. अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने एकट्याने 1500 पेट्रोल पंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केली. राज्यातील 70 टक्के पेट्रोल पंपांवर अशी छेडछाड सुरु असल्याची शक्यता पोलिसांना आहे. आता पोलिस त्यांच्या शोधात आहेत, जे पेट्रोल पंप मालकांना पोलिस कारवाईपासून वाचण्यास मदत करत आहेत. पोलिसांनी अटक केलेले तंत्रज्ञ
  1. शिबू थॉमस
  2. संदीप कांबळे
  3. श्रीनिवास चव्हाण
  4. व्यंकटेश्वर नाईक
  5. नितीन मोरे
  6. रवींद्र नेतेकर
दुसरीकडे साताऱ्यातील वाई इथल्या पेट्रोल पंपावर छापेमारीदरम्यान काही बनावट सीलही आढळून आले. आता ठाणे क्राईम ब्रांचने विदर्भाकडेही मोर्चा वळवला आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई आणखी कडक होईल, असं सांगण्यात येत आहे. संबंधित बातम्या कारवाई थांबवा, नाहीतर बेमुदत संप, पेट्रोलपंप डीलर्सचा...   चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी