Rahul Narvekar on Marathi: त्या दिवशी 12 शोक प्रस्ताव होते आणि त्याचे वाचन मी सभागृहात केले. ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं, ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. शोक प्रस्तावात मराठी वाचनाच्या 26 हून अधिक चुका करणाऱ्या राहुल नार्वेकरांवर सडकून टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नार्वेकरांच्या मराठीवर फटकारले होते. सोशल मीडियातही प्रहार सुरु होताच राहुल नार्वेकर यांनी दिलगिरीनामा विधानसभेत सादर केला. 

Continues below advertisement

स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल आदर

नार्वेकर यांनी सांगितले की, स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाहीआणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे, सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय, असे नार्वेकर म्हणाले. 

तेवढाच अभिमान मला मराठीचा अभिमान

राहुल नार्वेकर म्हणाले की, गेली चार-साडेचार वर्षे मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे. ते काम करत असताना मी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, अनेक शोक प्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत. या सभागृहाचा संपूर्ण प्रोसिडिंग नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल ही संपूर्ण आपण मराठी भाषेतूनच हाताळली आहे. जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या