सांगली : राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर ऊस दरासाठी रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना आता मैदानात उतरली आहे. रघुनाथ पाटलांच्या शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यात सुरु असलेली ऊसतोड बंद पाडली आहे.

दर जाहीर होण्याआधी ऊस तोड सुरु असल्याने शेतकरी संघटनेनं हे पाऊल उचललं आहे. उसाचा प्रतिएकरी उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर आणि कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती यावर आधारीत हा दर देण्यात यावा, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

ऊसतोड झालेला ऊस हा गाळप होण्यासाठी कर्नाटकात जात होता. त्यामुळं ऊसदराच्या प्रश्नासाठी पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेलं आंदोलन चिघळण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची शनिवारी स्वाभिमानी संघटनेकडून तोडफोड करण्यात आली. हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जात असल्याने, ही तोडफोड कऱण्यात आली.

संबंधित बातम्या

हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन चिघळलं