मुंबई : मागील आठ दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या आणि त्यावर आता सत्ताधारी भाजपकडून जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली आहे. अशीच एक टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शरद पवारांवर केली आणि त्यानंतर विखे पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. शरद पवारांकडे कार्यकर्तेच राहिले नाहीत, त्यामुळे ते अजित पवारांकडे जाणारच अशी टीका मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये शरद पवारांवर जोरदार टीका केली. दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चर्चा सुरू आहे, कारण आता शरद पवारांकडे कार्यकर्ता राहिलेला नाही. शरद पवारांनी आतापर्यंत राजकारणात जे पेरलं, त्याचं प्रायचित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे अशी टीका विखेंनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विखेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे
शरद पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजप सोडून कोणासोबत देखील युती केली तरी चालेल असं म्हणत कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या.
Ajit Pawar NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयोग
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकीत सहभागी होतं असल्याची बाब समोर अली. त्यानंतर हाच प्रयोग पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर बारामती नगर परिषदेत देखील होणार अशी माहिती समोर आली. त्यानंतर भाजपकडून जोरदार टीका शरद पवारांवर होण्यास सुरुवात झाली. राज्यात नेमकी किती ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी सोबत आल्या आहेत त्याबाबत मंगळवारी अधिकृत माहिती समोर येणार आहे. मंगळवारपर्यंत थांबा, तुम्हाला सगळं कळेल कोण कोणासोबत आहे ते अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार की नाही याबाबत शरद पवारांनाच विचारा असं म्हटलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. सत्तेसाठी नैतिकता, तत्व आणि निष्ठा गहाण ठेवून शाहांची चाकरी करणाऱ्या विखे पाटलांची पवार साहेबांवर बोलण्याची पात्रता नाही, अशा शब्दात अनिल देशमुख यांनी टीका केली.
पार्थ पवार प्रकरणामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार आहे. त्यामुळे खरंच दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का? जर झालीच तर अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार की शरद पवार सत्तेतील राष्ट्रवादीत सहभागी होणार हे पाहण औत्सुक्याचं असेल.
ही बातमी वाचा: