पुणे : कुत्रा भुंकल्याने झालेल्या वादावादीत तिसऱ्याचीच हत्या झाल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये घडली आहे. सागर चौगुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी  गणेश वाबळे, प्रवीण करपे, गोरख लोंढेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण?

हडपसर भागात गणेश वाभळेचा कुत्रा निलेश शिंदेच्या अंगावर धावून गेला. त्यातून निलेश आणि गणेशमध्ये भांडणं झाली. याच रागातून काल रात्री पुन्हा हाणामारी झाली. या मारामारीत निलेश शिंदेचा मित्र सागर चौगुलेच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

याच मारहाणीत  शकुंतला सावंत, सनी चौगुले, संदीप शिंदे यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत.

 

वाबळे, करपे आणि लोंढ यांच्याशिवाय इतर 7 ते 8 जण संशयित आरोपी आहेत. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.

 

पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.