Pune Swine flu :ऐनसणासुदीच्यातोंडावर पिंपरी-चिंचवडकरांची (Pimpri-Chinchwad) चिंतावाढवणारीबातमीसमोरआलीआहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव केल्याचीमाहितीसमोरआलीआहे. जानेवारीत एक, जुलैमध्ये पाच आणि ऑगस्ट महिन्यात अचानकपणे 31 रुग्ण आढळलेत, त्यामुळं शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळं शहरवासीयांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्रयोग्यतीखबरदारीघेण्याचंआवाहन महापालिका प्रशासनानं केलंय.

Continues below advertisement

दरम्यान, गेल्या सहा वर्षात 2022 मध्ये 58 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती, तेंव्हा ही ऑगस्टमध्ये 34 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2024 मध्ये 15 रुग्णांना लागण झाली होती आणि आता पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोकं वर काढलंय. मात्र गेल्या सहा वर्षाचा ट्रेंड पाहता, पॅनिक होण्याची गरज नाही. मात्र गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीत जाणं टाळावं, शक्यतो मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतर ही सर्दी, खोकला, ताप आल्यास पालिका रुग्णलयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. असा सल्ला पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलाय.

नेमका कशामुळे होतो स्वाईन फ्लू?  (H1N1 flu, Swine Flu, Symptoms and Causes)

Continues below advertisement

स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लक्षणे  आणि उपचार (Symptoms and Causes)

  • सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही सामान्य लक्षणे दिसतात.
  •  यामुळे घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो. 
  • गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे
  • ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांना अधिक सावधगिरी बाळगावी 
  • H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे म्हणजेच आयसोलेट केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरी स्वत:च औषधे घेणे टाळावे.

हे ही वाचा :