Pune Rain : पुण्यातील एकता नगरमधील सोसायटीत शिरलं पाणी, लोकांचा घरातून बाहेर पडण्यास नकार
राज्यात मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Pune Rain : राज्यात मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्याम, मुंबईसह पुण्यात देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील एकता नगर परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धारणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जात आहे.
घाटमाथ्यावरील पाऊस थांबत नसल्याने आणखीन विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकतानगर भागातील एका सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. खडकवासला धरणातून 35000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
एकतानगर या परिसरात सध्या महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता नगर या परिसरात सध्या महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत. इथं अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी महानगरपालिकेने या सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था एका शाळेत केली आहे. मात्र तरी देखील इथले लोक घरातून बाहेर यायला तयार नाहीत.. वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना आवाहन करत आहेत. मात्र काही लोक त्यांचं घराच्या बाहेर यायला तयार नाहीत.
इमारतींच्या पार्किंगमध्ये शिरलं पाणी
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या एकता नगर परिसरात पुन्हा एकदा लोकांच्या घरात इमारतींच्या पार्किंग मध्ये पाणी शिरलं आहे. अनेक लोकं सध्या घरात अडकून पडले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा फक्त प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आली अनेक मंत्री येऊन गेले मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. गेल्या वर्षी या एकता नगर परिसरात अनेक लोकांचा नुकसान झालं होतं त्याचं मोबदला देखील लोकांना मिळालेला नाही. या सगळ्या परिस्थितीला सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर, कोयना धरणातून विसर्ग सुरु
सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोयना धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आठव्यांदा वाढ करण्यात आली आहे. धरणातून 95 हजार 300 पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कोयना धरण 100 टीएमसी भरले आहे. गेल्या दोन दिवसात आठव्यांदा धरणाचे दरवाजे उचलून 13 फुटावर नेण्यात आले आहेत. धरणाच्या सर्व दरवाज्यातून 95 हजार 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीत केला जावू लागला आहे. कोयना नदी पात्रात दुथडी भरून वाहत आहे.. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आले आहेत.
मराठवाड्यात देखील मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं मोठ्या प्रमाणात (Marathwada Rain) नुकसान झालं आहे. तसेच आतापर्यंत 11 लोकांचा जीव देखील गेला आहे. तसेच शेती पिकांच देखील मोठं नुकसान झालं आहे. तर 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1 हजार 154 गावांना या पावसाचा फटका बसला आ
महत्वाच्या बातम्या:
परभणीत दुचाकीसह दोण जण गेला वाहून, प्रशासन घटनास्थळी दाखल, शोधकार्य सुरु
























