Puen Rain News : मावळ तालुक्याला (Maval Taluka) मुसळधार पावसाने (Pune Rain News) अक्षरशः झोडपून काढले असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंदर मावळातील इंगळून–पारिठेवाडी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी (Rain News)आल्याने हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटून शेतकरी, कामगार आणि नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. सुदैवाने आज रविवार असल्याने शाळांना सुट्टी होती आणि विद्यार्थ्यांना या अडचणीचा सामना करावा लागला नाही. (Pune Rain News)
दरम्यान, संबंधित विभागाने या मार्गावरील लहान-मोठ्या पुलांखालचे नाले तातडीने स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
Pune Rain News: पुणे शहरात गेल्या दोन दिवसात तब्बल 30 झाडपडीच्या घटना
दुसरीकडे, मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहरात तब्बल 30 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान पुण्यातील बीएमसीसी कॉलेजजवळील एक मोठे झाड शेजारील बंगल्यावर कोसळले. या घटनेत बंगल्याचे नुकसान झाले असून, सुदैवाने त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक रहिवाशांनी या धोकादायक वृक्षाबाबत यापूर्वीच महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, संबंधित नगरसेवकांनीही महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
Pune News : आंबेगाव खुर्द दत्तनगर-जांभुळवाडी रस्त्यावरील संरक्षक भिंत कोसळ;6 ते 7 वाहनांचे मोठे नुकसान
पुण्यातील आंबेगाव खुर्द दत्तनगर-जांभुळवाडी रस्त्यावरील थोरात बागेतील समृद्धी लेख शोअर सोसायटी येथे रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान संरक्षक भिंत कोसळली. या घटनेत 6 ते 7 वाहनांचे मोठे नुकसान झालेआहे. तर अनेक गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालाआहे. सोसायटीच्या भिंतीलगत सुरू असलेल्या अनधिकृत कामाची भिंत कोसळली असून पार्किंग केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Pune Rain Alert : धरणाच्या पाणीसाठ्यात हलकी वाढ
खडकवासला: १४.९७ टक्के
पानशेत: २२.९९ टक्के
वरसगाव: १७.६६ टक्के
टेमघर: २. ३१
एकूण पाणीसाठा: १७.४६ टक्के
गेल्या वर्षी (आजच्या तारखेला) पाणीसाठा: ६०.६२ टक्के
चिंतेत असलेल्या बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात यंदा पहिल्यांदाच 7000 क्युसेक विसर्जाने पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उजनी परिसरात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचे पाणी दौंड मधून उजनी धरणात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या उजनी धरण -28% इतक्या नीचांकी पातळीला पोचले असताना धरणात पाणी येऊ लागल्याने ही सुखद बातमी ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
