Pune PMPML News :   पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएमएल प्रशासनाने (PMPML) चांगलाच दणका दिला आहे. विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना आता चांगलाच फटका बसणार आहे. सुरुवातीलe विना तिकीट प्रवाशांकडून 300 रुपये दंड वसुल करण्यात येत होता. आता मात्र दंडाची किंमत वाढवली आहे. 300 रुपये नाही तर आता विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. 16 फेब्रुवारीला रुपये ऐवजी 500 रुपये इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या 10 मार्चपासून हा दंड आकारण्यात येणार आहे.


पुण्यात पीएमपीएमएलने (PMPML) प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोज सकाळी विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळे पीएमपीएमएलने (PMPML) प्रवास करतात मात्र त्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. येत्या काळात प्रवशांना विना तिकीट प्रवास करणं महागात पडणार आहे. त्यामुळे प्रवास करताना नियमांचं पालक करा, असं आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 


महिलांना महिन्याच्या 8 तारखेला मोफत प्रवास 


पुणे शहरात पीएमपीएमएलने (PMPML) प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात महिलांचीसंख्याही लक्षणीय आहे. पीएमपीएमएलच्या तेजस्विनी या खास महिला स्पेशल बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे.  या महिला दिनापासून पीएमपीएमएलकडून महिलांना खास गिफ्ट मिळणार आहे.  दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. 


पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आपल्या 'तेजस्विनी' बस सेवेतून दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत प्रवासाच्या मागणीला प्रतिसाद म्हणून 6 मार्च 2019 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


सुरुवातीला पीएमपीएमएलने 23 वेगवेगळ्या मार्गांवर केवळ महिलांसाठी 28 तेजस्विनी बसेस सुरू केल्या होत्या. मात्र कोविड काळात महिला प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे या बसेस तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. आता मात्र सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेच्या बस सेवा सुरू झाल्यामुळे पीएमपीएमएलने तेजस्विनी बस पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू केल्या आहेत. 8 मार्च 2023 पासून महिलांना दर महिन्याच्या 8 तारखेला 'तेजस्विनी' बससेवेतून मोफत प्रवास करता येईल. पीएमपीएमएल महिलांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करत आहे.