Pune News : पुण्यातील मावळमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. भोसरी परिसरातील तीन तरुणांचा जाधववाडी धरणात बुडून मृत्यूझाला आहे. सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पवना नदीतही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एका दिवसात चार जणांचा जीव गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण मित्रांसोबत फिरण्यासाठी मावळमध्ये गेले होते. पाण्यात उतरून सेल्फी घेत असताना एकजण खोल पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघेही बुडाले. दरम्यान, पवना नदीतही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एका दिवसात चार जणांचा जीव गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी धरण आणि नदी परिसरात जाताना अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पालघरमध्ये आढळलेल्या मृचजेहाचा अखेर उलगडा झाला

पालघरच्या नानिवली येथे आज पहाटे आढळून दोन मित्रांचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. भरधाव वेगात असलेली बाईक थेट इलेक्ट्रिक सोलर पोलनंतर झाडावर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या मितारने शेजारीच असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अपघाताचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसराईतून घरी परतत असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बाईक इलेक्ट्रिक पोलनंतर झाडावर आदळली होती. अपघातात पंधरा वर्षीय वैभव लहांगे याचा जागीच मृत्यू झाला आहे. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याचं समजतात बाईकवरील जखमी मित्र नितीन वरठा याने देखील शेजारी असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं. 

Continues below advertisement

वाशिमच्या समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना

वाशिमच्या समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. कारंजाच्या दोनद जवळ नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोरील लोखंडी रोल पत्रा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. लोखंडी रोल घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठा अपघात झाला. ट्रकला भीषण आग लागल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

ही घटना मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अपघाता नंतर समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ट्रकला आग लागल्यावर ही आग विझविण्यासाठी कारंजा नगरपालिका अग्निशमनने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ट्रक चालक आणि ट्रक चा पूर्णतः कोळसा झाला होता.

 

 

 

महत्वाच्या बातम्या:

Ahilyanagar News: मेंढीला वाचवायला गेलेली बहीण बुडताना पाहून भावाची पाण्यात उडी; दोघांचाही बुडून मृत्यू, घटनेनं अहिल्यानगर हळहळलं