Pune : पुण्यातील मुस्लिम बांधवांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद आल्यानं जूलूस पुढे ढकलण्याचा निर्णय पुण्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. 5 सप्टेंबर ऐवजी आता जुलूस 8 सप्टेंबरला निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे. 

दरम्यान, जूलूस आणि गणपती मिरवणुका एकत्र आल्या तर वाद होण्याची शक्यता असते. कोणत्याही सणाला गालबोट लागू नये, म्हणून पुण्यातील मुस्लिम बांधवांनी 5 तारखेला होणाऱ्या ईदसाठीचा जुलूस म्हणजेच मिरवणूक पुढे आठ सप्टेंबरला काढण्यात येणार आहे. पाच तारखेलाच पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका असतात. या मिरवणुका दोन दिवस चालतात. त्यात पोलीस प्रशासनदेखील कामाला लागलं असतं. या सगळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्याच आल्याचं मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी अन्वर शेख यांनी सांगितलं आहे.

गणेश विसर्जनाला निघालेले गणेश भक्त आणि जुलूसला निघालेले मुस्लिम बांधव यांच्यात तणाव निर्माण होऊ नये. तसेच विसर्जन आणि जुलूस शांततेत पार पडावा यासाठी मुस्लिम बांधवांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. काही मुस्लिम बांधवांनी गणशे विसर्जन झाल्यानंतर मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

लालबागचा राजा परिसरात अग्निशमन बंबास दिवसाला सव्वा लाख भाडे, बैठकीत मुद्दा; मुख्यमंत्र्यांकडून कमी करण्याचं आश्वासन