Pune News : पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळं वाहतूक शाखेनं मोठा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेनं वेगमर्यादेत बदल केला आहे. कात्रज बायपास महामार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेटवर पर्यंतच्या संपूर्ण मार्गावर आता ताशी 40 किमी वेगमर्यादा करण्यात आली आहे. यापूर्वी ताशी 30 वेगमर्यादा करण्यात आली होती, मात्र आता वाहतूक शाखेने यात बदल करुन ताशी 40 वेगमर्यादा केली आहे. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर उपाययोजना म्हणून वेगमर्यादा निश्चित केली आहे.
वेगमर्यादा क्रॉस केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार
वेगमर्यादा क्रॉस केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतून शाखेनं सांगितलं आहे. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर CCTV व स्पीड गनच्या साहाय्याने कारवाई केली जाणार आहे. वाहनांची गर्दी, जड वाहनांची वाहतूक आणि रस्त्यांची सुधारणा सुरू असतानाही अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यात वेगमर्यादा निश्चित करणे हा महत्वाचा उपाय मानला जात आहे.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील कात्रज बोगदा ते नवले पूल हा भाग अपघात क्षेत्र बनला आहे. त्यामुळे सन 2022 मध्ये पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे पोलिस यांनी एकत्रित उपाययोजना करण्याबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर तातडीच्या काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली, तर दीर्घकालीन उपाययोजनांवर काम सुरू केले होते. मात्र, सध्याही या पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पुलाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर नागरिकरण
बंगळुरू-मुंबई बाह्यवळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पुलाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाल्यानंतर हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. हा महामार्ग 24 तास व्यग्र असतो. बरोबर तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच अशी दुर्दैवी घटना घडली होती, त्यामध्ये तब्बल 47 गाड्यांचं नुकसान झाले होते, तेव्हा पासून नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. तरीही प्रशासन ढिम्म राहिले आहे. तात्पुरत्या उपाययोजना केल्या की बस. पण वेगाने येणाऱ्या गाड्या कोण थांबवणार? अपघातांची ही मालिका कधी थांबणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या: